मुंबई, २० मार्च २०२४, प्रतिनिधी : भूषण गगराणी यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी, सौरभ राव यांची ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदी तर कैलास शिंदे यांची नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रशासन आणि पोलीस दलातील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू केल्या आहेत. ज्या अधिकाऱ्यांना एकाच ठिकाणी तीन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षे झाली आहेत त्यांची सरसकट बदली केली जात आहे. निवडणूक आयोगाने मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नव्या आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
भूषण गगराणी मुंबई महापालिका आयुक्तपदी
सौरभ राव ठाणे महापालिका आयुक्तपदी
कैलास शिंदे नवी मुंबई महापालिका आयुक्तपदी