नाशिकमधील बस कर्मचाऱ्यांचे आंदोलन कायम

नाशिक, २० मार्च २०२४, प्रतिनिधी : गेल्या सात दिवसांपासून सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. परंतु अद्यापही त्यांच्या आंदोलनावर तोडगा काढता आलेली नाही. पगार, पीएफसह इतर मागण्यांसाठी बस कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. यामुळे शहरातील बस सेवा ठप्प झाली असून त्याचा प्रवाशांना मोठा फटका […]

नाशिकमधील बस कर्मचाऱ्यांचे आंदोलन कायम

नाशिक, २० मार्च २०२४, प्रतिनिधी : गेल्या सात दिवसांपासून सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. परंतु अद्यापही त्यांच्या आंदोलनावर तोडगा काढता आलेली नाही. पगार, पीएफसह इतर मागण्यांसाठी बस कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. यामुळे शहरातील बस सेवा ठप्प झाली असून त्याचा प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. गेल्या सात दिवसापासून संपावर तोडगा निघत नसल्याने प्रशासनाकडून ठेका रद्द करण्याचे ठेकेदाराला अंतिम नोटीस बजावण्यात आले आहे. तसेच ठेकेदाराच्या माध्यमातून मनपाकडून शहरासाठीची बस सेवा सुरू आहे. बस कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघायला हवा नाहीतर नाशिकमधील बस सेवा विस्कळीत होऊन नागरिकांना आणखीन त्याचा त्रास होऊ शकतो.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number