छत्रपती संभाजीनगर, १९ मार्च २०२४, प्रतिनिधी : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात क्लबमध्ये पैसे लाऊन तीन पत्ती जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांनी धाड टाकत १८ जणांना ताब्यात घेतले आहे. एकूण ३ लाख ११ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे. वैजापूर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक महक स्वामी […]
छत्रपती संभाजीनगर, १९ मार्च २०२४, प्रतिनिधी : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात क्लबमध्ये पैसे लाऊन तीन पत्ती जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांनी धाड टाकत १८ जणांना ताब्यात घेतले आहे. एकूण ३ लाख ११ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे. वैजापूर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक महक स्वामी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.