पुण्याच्या हत्येची संभाजीनगरमध्ये पुनरावृत्ती, लघुउद्योजकाच्या मृत्यूने खळबळ

छत्रपती संभाजीनगर, १८ मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर राज्यात आचार संहिता लागू झाली आहे. मात्र, निवडणूक जाहीर होऊन काही तास उलटत नाही तोच राज्यात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. १६ मार्च रोजी पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये तरुणाची गोळी घालून हत्या केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता छत्रपती संभाजीनगरमधून अशीच घटना समोर […]

पुण्याच्या हत्येची संभाजीनगरमध्ये पुनरावृत्ती, लघुउद्योजकाच्या मृत्यूने खळबळ

छत्रपती संभाजीनगर, १८ मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर राज्यात आचार संहिता लागू झाली आहे. मात्र, निवडणूक जाहीर होऊन काही तास उलटत नाही तोच राज्यात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. १६ मार्च रोजी पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये तरुणाची गोळी घालून हत्या केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता छत्रपती संभाजीनगरमधून अशीच घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साजापूर क्रांतीनगर येथे एका लघुउद्योजकाची डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. सचिन साहेबराव नरवडे (वय ३८) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गोळीबार का केला ? आणि कुणी केला ? याचा शोध पोलीस घेत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number