इंदापूरच्या हॉटेलमध्ये गोळीबार, एकाची हत्या

पुणे, दि. १७ मार्च, २०२४, प्रतिनिधी : इंदापूर शहरातील जगदंबा हॉटेलमध्ये एकाची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. अचानक झालेल्या गोळीबाराने सगळीकडे खळबळ उडाली. दरम्यान गोळीबार कोणी केला, हे अद्याप समजू शकले नसून हा गोळीबार पूर्व वैमानसातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव अविनाश धनवे असल्याचे सांगितले जात […]

इंदापूरच्या हॉटेलमध्ये गोळीबार, एकाची हत्या

पुणे, दि. १७ मार्च, २०२४, प्रतिनिधी : इंदापूर शहरातील जगदंबा हॉटेलमध्ये एकाची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. अचानक झालेल्या गोळीबाराने सगळीकडे खळबळ उडाली. दरम्यान गोळीबार कोणी केला, हे अद्याप समजू शकले नसून हा गोळीबार पूर्व वैमानसातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव अविनाश धनवे असल्याचे सांगितले जात असून तो पुण्याकडील आळंदी परिसरातील राहणार असल्याचे समजते. 

ही घटना इंदापूरच्या बायपासवरील जगदंबा हॉटेलमध्ये घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अविनाश धनवे हा त्याच्या मित्रांसह जगदंबा हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलेला असताना दबा धरून बसलेल्या पाच ते सहा जणांनी त्याच्यावर हल्ला केला. यामध्ये त्याच्या डोक्यातही गोळी लागली. त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number