कारागृहातील कैद्यांसाठी विशेष सुविधा उपलब्ध

नागपूर, १६ मार्च २०२४, प्रतिनिधी : नागपूर मध्यवर्ती कारागृहात कैद्यांसाठी स्मार्ट टेलिफोन व ई-किओस्कची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अपर पोलीस महासंचालक (कारागृह) अमिताभ गुप्ता व विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्या ऑनलाईन उपस्थितीत सुविधांचे उद्घाटन करण्यात आले. ई किओस्कच्या माध्यमातून कैद्यांना शिक्षा प्रकरण व न्यायप्रविष्ट प्रकरणाबाबत माहिती घेता येईल. कारागृहातील सर्कल परिसरात हे […]

कारागृहातील कैद्यांसाठी विशेष सुविधा उपलब्ध

नागपूर, १६ मार्च २०२४, प्रतिनिधी : नागपूर मध्यवर्ती कारागृहात कैद्यांसाठी स्मार्ट टेलिफोन व ई-किओस्कची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अपर पोलीस महासंचालक (कारागृह) अमिताभ गुप्ता व विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्या ऑनलाईन उपस्थितीत सुविधांचे उद्घाटन करण्यात आले. ई किओस्कच्या माध्यमातून कैद्यांना शिक्षा प्रकरण व न्यायप्रविष्ट प्रकरणाबाबत माहिती घेता येईल. कारागृहातील सर्कल परिसरात हे किओस्क उभारण्यात आले आहे. या प्रणालीमुळे कैद्यांना त्यांची न्यायालयातील सुनावणीची तारीख, अभिवचन रजा, संचित रजा, उपहारगृह इत्यादींची सखोल माहिती मिळेल.  बायोमॅट्रीक प्रणालीतून अंगठ्याच्या माध्यमातून कैदी याचा वापर करू शकतील. तर ॲलन फोन सुविधेमुळे आठवड्यातून तीन वेळा प्रत्येकी सहा मिनिटांसाठी नातेवाईक, वकिल किंवा कुटुंबातील इतर सदस्यांशी बोलता येणार आहे. महिन्यातून कैद्यांना १२ वेळा फोन करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक आठवड्यात एक वेळा व्हिडीओ कॉलची सुविधादेखील राहणार आहे. या सुविधांमुळे गैरप्रकाराने बाहेर संपर्क करण्याच्या गोष्टींवर आळा येईल, असा विश्वास अमिताभ गुप्ता यांनी व्यक्त केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number