छत्रपती संभाजीनगर, दि. १५ मार्च, २०२४, प्रतिनिधी – पैठण तालुक्याला मोसंबीचा माहेरघर म्हणून ओळखले जाते. मात्र आता येथील मोंसबीला योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी संतप्त होत आहेत. पाचोड येथील मोसंबीच्या बाजारपेठेत पैठण तालुक्यातील खादगाव येथील आप्पासाहेब कोल्हे या शेतकऱ्याने पाच गोण्या मोसंबी विक्रीसाठी बाजारपेठेत आणली होती. ही मोसंबी बाजारपेठेमध्ये घेऊन येईपर्यंत या शेतकऱ्याला अडीचशे रुपये खर्च आला. मात्र जेव्हा विक्री करण्याची वेळ आली तेव्हा व्यापाऱ्यांनी केवळ शंभर रुपयांमध्ये सगळा माल मागितला. शेतकऱ्यांनी संताप्त होऊन चक्क मोसंबी रस्त्यावर फेकली आहे. तरी आता सरकारने मोसंबीला हमीभाव जाहीर करावे अशी मागणी शेतकरी करत आहेत.