वाघ हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर, १५ मार्च २०२४, प्रतिनिधी : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात असलेल्या गौतळा अभयारण्याजवळील हसनाबाद गावातील शेतकरी चरणदास हारसिंग जाधव सकाळी आठच्या सुमारात शेतात पाहणी करण्यासाठी गेले असता वाघाने त्यांच्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. प्रसंगावधान राखत त्यांनी तात्काळ वाघाच्या ताडीतून स्वतःची सुटका करून घेतली मात्र त्यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे. सायगव्हाण […]

वाघ हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर, १५ मार्च २०२४, प्रतिनिधी : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात असलेल्या गौतळा अभयारण्याजवळील हसनाबाद गावातील शेतकरी चरणदास हारसिंग जाधव सकाळी आठच्या सुमारात शेतात पाहणी करण्यासाठी गेले असता वाघाने त्यांच्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. प्रसंगावधान राखत त्यांनी तात्काळ वाघाच्या ताडीतून स्वतःची सुटका करून घेतली मात्र त्यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे. सायगव्हाण गावच्या ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी सदर घटनेची दखल घेत तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जाधव यांना उपचारासाठी चाळीसगाव येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच या घटनेची माहिती तात्काळ वन विभागाला देखील कळवण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number