मराठा आरक्षणासाठी पुन्हा एका तरुणाची आत्महत्यागोदावरी नदीत उडी मारून केली आत्महत्या

नेवासा, १४ मार्च, २०२४, प्रतिनिधी : मराठा आरक्षणाचा आणखी एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना नेवासा मध्ये घडली आहे. बजाजनगर येथील महेश उर्फ ओम मोहन मोरे या युवकाने छत्रपती संभाजीनगर – अहमदनगर महामार्गावरील कायगांव टोका येथील गोदावरी नदीत उडी घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी महेशने आईला मोबाईलवरुन मेसेज पाठवला होता. आई… मराठा आरक्षणासाठी मी बलिदान देत आहे, […]

मराठा आरक्षणासाठी पुन्हा एका तरुणाची आत्महत्यागोदावरी नदीत उडी मारून केली आत्महत्या

नेवासा, १४ मार्च, २०२४, प्रतिनिधी : मराठा आरक्षणाचा आणखी एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना नेवासा मध्ये घडली आहे. बजाजनगर येथील महेश उर्फ ओम मोहन मोरे या युवकाने छत्रपती संभाजीनगर – अहमदनगर महामार्गावरील कायगांव टोका येथील गोदावरी नदीत उडी घेत आत्महत्या केली.

आत्महत्येपूर्वी महेशने आईला मोबाईलवरुन मेसेज पाठवला होता. आई… मराठा आरक्षणासाठी मी बलिदान देत आहे, समाजासाठी एक जीव माझा पण, असा मेसेज त्याने आत्महत्येपूर्वी केला होता.

या तरुणाचा मृतदेह गोदावरी नदीपात्रात शोध मोहिमेनंतर सापडला. त्यानंतर नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number