अपघातमुक्त महाराष्ट्रासाठी १८७ इंटरसेप्टरचे लोकार्पण

मुंबई, १३ मार्च २०२४, प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत १८७ इंटरसेप्टरचे लोकार्पण करण्यात आले. पहिल्या इंटरसेप्टर वाहनाचे सारथ्य महिला चालक मोनिका साळुंखे यांनी केले. इंटरसेप्टर वाहनांमुळे रस्ता सुरक्षा अधिक सक्षम होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातील अपघात कमी व्हावेत यासाठी वाहतुकीच्या नियमांविषयी जनजागृती करणे, तसेच स्पीड गन, कृत्रिम बुद्धमत्ता या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर […]

अपघातमुक्त महाराष्ट्रासाठी १८७ इंटरसेप्टरचे लोकार्पण

मुंबई, १३ मार्च २०२४, प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत १८७ इंटरसेप्टरचे लोकार्पण करण्यात आले. पहिल्या इंटरसेप्टर वाहनाचे सारथ्य महिला चालक मोनिका साळुंखे यांनी केले. इंटरसेप्टर वाहनांमुळे रस्ता सुरक्षा अधिक सक्षम होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यातील अपघात कमी व्हावेत यासाठी वाहतुकीच्या नियमांविषयी जनजागृती करणे, तसेच स्पीड गन, कृत्रिम बुद्धमत्ता या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, नाक्यानाक्यांवर वाहन चालकांची तपासणी करणे, रम्बलर लावणे असे प्रयोग केले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. सलग अनेक तास वाहन चालवण्याऐवजी ठराविक तासांनंतर चालकांनी पुरेशी विश्रांती घ्यावी आणि ताजेतवाने होऊन वाहन चालवावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number