महाशिवरात्रीनिमित्त सांगलीत साकारले ३६ फुटी शिवलिंग

सांगली जिल्ह्यात महाशिवरात्रीनिमित्त प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा सांगली यांच्या वतीने दोन दिवसीय शिवदर्शन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विश्रामबाग येथील नेमिनाथनगर ग्राउंड वर हा शिवदर्शन महोत्सव शुक्रवारपासून सुरू झाला आहे. या महोत्सवामध्ये सर्वात महत्त्वाचे आकर्षण म्हणजे या ठिकाणी ३६ फुटी शिवलिंग उभारण्यात आले आहे. हे प्रदर्शन सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहणार […]

महाशिवरात्रीनिमित्त सांगलीत साकारले ३६ फुटी शिवलिंग

सांगली जिल्ह्यात महाशिवरात्रीनिमित्त प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा सांगली यांच्या वतीने दोन दिवसीय शिवदर्शन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विश्रामबाग येथील नेमिनाथनगर ग्राउंड वर हा शिवदर्शन महोत्सव शुक्रवारपासून सुरू झाला आहे. या महोत्सवामध्ये सर्वात महत्त्वाचे आकर्षण म्हणजे या ठिकाणी ३६ फुटी शिवलिंग उभारण्यात आले आहे. हे प्रदर्शन सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. याचबरोबर याठिकाणी बारा ज्योतिर्लिंग दर्शनसुद्धा या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहे. याचबरोबर महाशिवरात्रीचे अध्यात्मिक रहस्य,  रावण जिवंत आहे ही नृत्यनाटिका आणि ९ मार्च रोजी संगीतसंध्या या कार्यक्रमाने या दोन दिवसीय शिवदर्शन महोत्सवाची सांगता होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून याचा सर्व सांगलीकर नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व महाविद्यालय शाखा सांगली कडून करण्यात येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number