काय म्हणता, ९२ व्या वर्षी पाचव्यांदा लग्न

वॉशिंग्टन, ८ मार्च २०२४, प्रतिनिधी : माध्यम सम्राट रुपर्ट मरडॉक ९२ व्या वर्षी पाचव्यांदा लग्न करणार आहेत. रुपर्ट यांची होणार असलेली पत्नी अॅलेना झुकोव्हा मूळची रशियाची राजधानी मॉस्को येथील रहिवासी आहे. ती ६७ वर्षांची आहे. सुक्ष्मजीव शास्त्रज्ञ आहे. रुपर्ट यांची तिसरी पत्नी वेंडी डेंगने काही वर्षांपूर्वी रुपर्ट आणि अॅलेना यांची ओळख करून दिली. मागील काही […]

काय म्हणता, ९२ व्या वर्षी पाचव्यांदा लग्न

वॉशिंग्टन, ८ मार्च २०२४, प्रतिनिधी : माध्यम सम्राट रुपर्ट मरडॉक ९२ व्या वर्षी पाचव्यांदा लग्न करणार आहेत. रुपर्ट यांची होणार असलेली पत्नी अॅलेना झुकोव्हा मूळची रशियाची राजधानी मॉस्को येथील रहिवासी आहे. ती ६७ वर्षांची आहे. सुक्ष्मजीव शास्त्रज्ञ आहे. रुपर्ट यांची तिसरी पत्नी वेंडी डेंगने काही वर्षांपूर्वी रुपर्ट आणि अॅलेना यांची ओळख करून दिली. मागील काही वर्षांपासून दोघांच्या संपर्कात वाढ झाली आहे. आता या ओळखीचे रुपांतर नात्यात होत आहे.

रुपर्ट मरडॉक आणि अॅलेना झुकोव्हा यांचे लग्न अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतातील रुपर्ट यांच्या वाइनयार्डमध्ये होणार आहे. काही महिन्यांपूर्वी रुपर्ट यांनी फॉक्स अँड न्यूज कॉर्पोरेशनचे अध्यक्षपद सोडले आहे. या राजीनाम्यानंतर काही महिन्यांतच रुपर्ट पाचव्या लग्नासाठी तयारी करत आहेत.

रुपर्ट मरडॉक आणि त्यांच्या पत्नी

पहिली पत्नी – ऑस्ट्रेलियातील फ्लाइट अटेंडंट, पेट्रीसिया बुकर, लग्न १९५६ आणि घटस्फोट १९६७
दुसरी पत्नी – मूळची स्कॉटलंडची असलेली पत्रकार अॅना मान, लग्न १९६७ आणि घटस्फोट १९९९
तिसरी पत्नी – अभिनेत्री आणि मॉडेल वेंडी डेंग, लग्न १९९९ आणि घटस्फोट २०१३
चौथी पत्नी – अभिनेत्री जेरी हॉल, लग्न २०१६ आणि घटस्फोट २०२२

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number