चाकरमान्यांचा शिमगा होणार उत्साहात

प्रतिनिधी, नवी मुंबई, दि. ०७ मार्च २०२४ : होळीचा सण दोन आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. अनेकांनी महिन्यापूर्वीच आरक्षण करून ठेवले आहे. असे असले, तरी कोकणात जाणाऱ्या गाड्यांची प्रतीक्षायादीही तितकीच मोठी आहे. त्यामुळे उत्सव काळात या गाड्यांना गर्दी होण्याची शक्यता आहे. होळीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गर्दी असते. […]

चाकरमान्यांचा शिमगा होणार उत्साहात

प्रतिनिधी, नवी मुंबई, दि. ०७ मार्च २०२४ : होळीचा सण दोन आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. अनेकांनी महिन्यापूर्वीच आरक्षण करून ठेवले आहे. असे असले, तरी कोकणात जाणाऱ्या गाड्यांची प्रतीक्षायादीही तितकीच मोठी आहे. त्यामुळे उत्सव काळात या गाड्यांना गर्दी होण्याची शक्यता आहे. होळीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गर्दी असते. ही बाब लक्षात घेऊन कोकण रेल्वेने १९ ते २७ मार्च या दरम्यान विशेष साप्ताहिक गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांसाठी ८ मार्चपासून आरक्षण सुरू होणार असल्याचे कोकण रेल्वेने कळविले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number