अहमदनगर, ६ मार्च २०२४, प्रतिनिधी : अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील एका खासगी मेडिकल महाविद्यालयाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला आहे. हा मोर्चा विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयापर्यंत काढला आहे. परीक्षा फॉर्मवर जितका शुल्क आहे तितकाच आकारण्यात यावा या मुद्द्याला घेऊन विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.
परीक्षा फॉर्मवर जितका शुल्क आहे तितकाच आकारण्यात यावा. बॅकलॉगची एक्स्ट्रा फी आकारू नये, प्रॅक्टिकल तसेच इंडस्ट्रियल सहलीच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून आर्थिक लूट होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी महाविद्यालयावर केला आहे. जोपर्यंत संबंधित महाविद्यालयाच्या चालकावर कारवाई होत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा यावेळी विद्यार्थ्यांनी दिला आहे तसेच विद्यार्थ्यांनी त्यांची भूमिका निवेदनाद्वारे तहसिलदार यांना दिली आहे.