तानाजी मालुसरेंच्या समाधीचे सुशोभीकरण करणार

रायगड, ५ मार्च २०२४, प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा, पराक्रमाचा वारसा असलेल्या गडकिल्ल्यांचे संवर्धन राज्य शासनामार्फत केले जात आहे. तसेच स्वराज्य निर्मितीसाठी प्राणपणाने लढलेल्या मावळयांच्या कार्यातून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळावी, म्हणून ऐतिहासिक स्थळांचा, गावांचा विकास केला जात आहे. या अंतर्गत उमरठ येथील नरवीर तानाजी मालुसरे यांचे समाधीस्थळ सुशोभिकरण आणि परिसराचा विकास करण्यासाठी दहा कोटी […]

तानाजी मालुसरेंच्या समाधीचे सुशोभीकरण करणार

रायगड, ५ मार्च २०२४, प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा, पराक्रमाचा वारसा असलेल्या गडकिल्ल्यांचे संवर्धन राज्य शासनामार्फत केले जात आहे. तसेच स्वराज्य निर्मितीसाठी प्राणपणाने लढलेल्या मावळयांच्या कार्यातून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळावी, म्हणून ऐतिहासिक स्थळांचा, गावांचा विकास केला जात आहे. या अंतर्गत उमरठ येथील नरवीर तानाजी मालुसरे यांचे समाधीस्थळ सुशोभिकरण आणि परिसराचा विकास करण्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. तसेच या परिसराचा विकास करण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील उमरठ येथे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या ३५४ व्या पुण्यतिथीनिमित्त नरवीर तानाजी मालुसरे यांचे समाधीस्थळ व परिसर सुशोभिकरण कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, (ऑनलाईन), उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनिल तटकरे, आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी किशन जावळे, ज्येष्ठ इतिहासकार आप्पासाहेब परब, स्थानिक समिती अध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number