अभिनेत्री तमन्ना भाटियाने चित्रपटसृष्टीत केली १९ वर्षे पूर्ण

मुंबई , ५ मार्च २०२४, प्रतिनिधी : हिंदी तसेच दाक्षिणात्य सिने सृष्टीत आपल्या मनमोहक सौंदर्याने चाहत्यांना भुरळ पाडणारी अभिनेत्री तमन्ना भाटियाने सिनेसृष्टीत १९ वर्षे पूर्ण केली आहेत आणि या निमित्ताने तिच्या चाहत्यांनी एक खास गोष्ट केली आहे. तमन्ना ने २००५मध्ये बॉलीवूड चित्रपट ‘चांद सा रोशन चेहरा’ मधून अभिनयात पदार्पण केले परंतु ती दक्षिण चित्रपट उद्योगातील […]

अभिनेत्री तमन्ना भाटियाने चित्रपटसृष्टीत केली १९ वर्षे पूर्ण

मुंबई , ५ मार्च २०२४, प्रतिनिधी : हिंदी तसेच दाक्षिणात्य सिने सृष्टीत आपल्या मनमोहक सौंदर्याने चाहत्यांना भुरळ पाडणारी अभिनेत्री तमन्ना भाटियाने सिनेसृष्टीत १९ वर्षे पूर्ण केली आहेत आणि या निमित्ताने तिच्या चाहत्यांनी एक खास गोष्ट केली आहे. तमन्ना ने २००५मध्ये बॉलीवूड चित्रपट ‘चांद सा रोशन चेहरा’ मधून अभिनयात पदार्पण केले परंतु ती दक्षिण चित्रपट उद्योगातील सर्वात जास्त मागणी असलेली अभिनेत्री बनली. एसएस राजामौली यांच्या मॅग्नम ओपस ‘बाहुबली: द बिगिनिंग’मध्ये तिने अवंतिका साकारलेली तिची भूमिका लोकांनी डोक्यावर घेतली. पुढे जाऊन तिने ‘बबली बाउंसर’, ‘लस्ट स्टोरीज २’ आणि इतर प्रकल्पांसह तिची बहुमुखी प्रतिभा दाखवली. २०२३ मध्ये, तमन्नाने चिरंजीवी-स्टारर ‘भोला शंकर’ सह बॉक्स ऑफिसवर राज्य केले तर रजनीकांत-स्टारर ‘जेलर’ मधील तिच्या ‘कावला’ गाण्याने देशाला वेड लावले आणि ‘बांद्रा’ मधून तिचे मल्याळम इंडस्ट्रीत पदार्पण केले.

तिची खास मैत्रीण काजल अग्रवाल हिने तमन्नाला सिनेमात जवळपास दोन दशके पूर्ण केल्याबद्दल तिचं कौतुक करून तिला खास शुभेच्छा दिल्या. यावर तमन्ना म्हणाली “खूप खूप धन्यवाद काजू, तुझा अतुलनीय पाठिंबा आणि प्रेम इतक्या वर्षांमध्ये मला कायम प्रोत्साहन देत राहील”

चाहत्यांना उद्देशून तमन्नाने लिहिले की “माझ्या सर्व कामासाठी तुम्ही कायम माझ्या पाठीशी उभे असता आणि तुमचा पाठिंबा माझ्यासाठी खूप काही आहे. मी तुम्हाला आवडतील असे सिनेमे बनवत राहण्याचे वचन देते आणि हा प्रवास तुमच्या प्रेमाने कायम सुरू राहू दे ही इच्छा व्यक्त करते “

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number