पुणे, २ मार्च २०२४, प्रतिनिधी : मनोज जरांगे यांच्या विरोधातली विशेष तपास पथकाची चौकशी अर्थात एसआयटी चौकशी थांबवा, अशी मागणी आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोड यांनी केली आहे. विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्देश दिल्यानंतर मनोज जरांगे आणि त्यांच्या आंदोलनाची चौकशी सुरू झाली आहे. पोलिसांनी चौकशीसाठी काही जणांना अटक केली आहे. जरांगेंच्या आंदोलनामागे कायदा – सुव्यवस्था बिघडवण्याच्या हेतूने काही नेते सहभागी झाल्याचा आरोप होत आहे. या आरोपांतील सत्यतता तपासण्यासाठी चौकशी सुरू आहे. पण आरक्षणाची मागणी करणाऱ्या आणि त्यासाठी आंदोलन करणाऱ्याची चौकशी करणे योग्य नाही, असे सांगत हरिभाऊ राठोड यांनी जरांगे यांच्या विरोधातली चौकशी थांबवण्याची मागणी केली आहे.