येवला मुक्तीभूमीवरील विकासकामांचे लोकार्पण

येवला, १ मार्च २०२४, प्रतिनिधी : मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमीचा विकास करण्यात आला आहे. या मुक्तीभूमीवरील १५ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण रविवार ३ मार्च २०२४ रोजी संध्याकाळी चार वाजता करण्यात येणार आहे. नॉर्वे येथील भिक्खू वाटसनपॉन्ग मेडिटेशन सेंटरचे संचालक फ्रा ख्रुसुतमतावाचाई मठी आणि बुद्ध इंटरनॅशनल वेलफेअर मिशन […]

येवला मुक्तीभूमीवरील विकासकामांचे लोकार्पण

येवला, १ मार्च २०२४, प्रतिनिधी : मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमीचा विकास करण्यात आला आहे. या मुक्तीभूमीवरील १५ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण रविवार ३ मार्च २०२४ रोजी संध्याकाळी चार वाजता करण्यात येणार आहे. नॉर्वे येथील भिक्खू वाटसनपॉन्ग मेडिटेशन सेंटरचे संचालक फ्रा ख्रुसुतमतावाचाई मठी आणि बुद्ध इंटरनॅशनल वेलफेअर मिशन तसेच इंटरनॅशनल बुद्धीस्ट मॉक ट्रेनिंग स्कूलचे संस्थापक सचिव भिक्खू बी.आर्यपल यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येईल. या कार्यक्रमाला मंत्री छगन भुजबळ उपस्थित असतील.

दादरची चैत्यभूमी आणि नागपूर येथील दिक्षाभूमी प्रमाणेच येवल्याच्या मुक्तीभूमीला ऐतिहासिक महत्व आहे. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे धर्मांतराची घोषणा केली होती. त्यामुळे या ऐतिहासिक स्थळाला मुक्तिभूमी असे संबोधण्यात येते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number