संदेशखाली हिंसेप्रकरणी शाहजहान शेखला अटक

बशीरहाट, २९ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : संदेशखाली येथील महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि जबरदस्तीने जमिनी ताब्यात घेण्याच्या प्रकरणात मुख्य आरोपी तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेखला पोलिसांनी अटक केली आहे. तो मागील ५५ दिवसांपासून फरार होता. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस शाहजहान शेखला वाचवत असल्याचा आरोप भाजपाने केला. अखेर शाहजहान शेखला पश्चिम बंगाल पोलिसांनी उत्तर २४ परगणा येथून अटक […]

संदेशखाली हिंसेप्रकरणी शाहजहान शेखला अटक

बशीरहाट, २९ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : संदेशखाली येथील महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि जबरदस्तीने जमिनी ताब्यात घेण्याच्या प्रकरणात मुख्य आरोपी तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेखला पोलिसांनी अटक केली आहे. तो मागील ५५ दिवसांपासून फरार होता. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस शाहजहान शेखला वाचवत असल्याचा आरोप भाजपाने केला. अखेर शाहजहान शेखला पश्चिम बंगाल पोलिसांनी उत्तर २४ परगणा येथून अटक केले. अटक केल्यानंतर त्याला बशीरहाट येथे न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे हजर करण्यात आले. न्यायदंडाधिकाऱ्यांनी शाहजहान शेखला दहा दिवसांची पोलीस कोठडी दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number