उद्यापासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु

मुंबई , २५ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून (सोमवार) सुरु होत आहे. या अधिवेशनात पहिल्या दिवशी (२६ फेब्रुवारी रोजी) सन २०२३-२४ या वर्षाच्या पुरवणी मागण्या मांडण्यात येतील तर दुसऱ्याच दिवशी २७ फेब्रुवारी रोजी लेखानुदान अर्थात अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाईल . अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज महत्वाची […]

उद्यापासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु

मुंबई , २५ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून (सोमवार) सुरु होत आहे. या अधिवेशनात पहिल्या दिवशी (२६ फेब्रुवारी रोजी) सन २०२३-२४ या वर्षाच्या पुरवणी मागण्या मांडण्यात येतील तर दुसऱ्याच दिवशी २७ फेब्रुवारी रोजी लेखानुदान अर्थात अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाईल . अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज महत्वाची बैठक होणार आहे. या अधिवेशनाच्या वेळी भाजपा आमदार राजेंद्र पाटणी तसेच माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा शोकप्रस्ताव मांडून त्यामुळे पहिल्या दिवशीचे कामकाज संपेल. त्यानंतर २७ फेब्रुवारीला सकाळी पुरवणी मागण्यांवर चर्चा होऊन त्या मंजूर केल्या जातील. दुपारी दोन वाजता सन २०२४-२५ या वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येईल. अधिवेशनाच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी अंतरिम अर्थसंकल्पावर चर्चा होऊन तो मंजूर केला जाईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number