‘उद्धवना सत्तेचा मोह’

मुंबई, १७ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : उद्धव यांना सत्तेचा मोह होता. या मोहासाठीच त्यांना सलग पाच वर्षांसाठी सत्ता हवी होती. मुख्यमंत्री व्हायचे आणि अधिकाधिक लाभ मिळवायचे हीच त्यांची महत्त्वाकांक्षा होती, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते कोल्हापूर येथे शिवसेनेच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलत होते. पक्ष मोठा व्हावा, पक्षातील सहकारी मोठे व्हावेत यासाठी उद्धव यांनी मेहनत घेतलीच […]

‘उद्धवना सत्तेचा मोह’

मुंबई, १७ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : उद्धव यांना सत्तेचा मोह होता. या मोहासाठीच त्यांना सलग पाच वर्षांसाठी सत्ता हवी होती. मुख्यमंत्री व्हायचे आणि अधिकाधिक लाभ मिळवायचे हीच त्यांची महत्त्वाकांक्षा होती, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते कोल्हापूर येथे शिवसेनेच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलत होते. पक्ष मोठा व्हावा, पक्षातील सहकारी मोठे व्हावेत यासाठी उद्धव यांनी मेहनत घेतलीच नाही. उलट एखादा मोठा होताना दिसला की त्याचे पंख कापले जात होते, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. उद्धवना सोडून गेलेले कार्यकर्ते आणि महाराष्ट्र एक दिवस त्यांनाच कचऱ्यात टाकतील, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

शिवसेना पक्ष पुढे जात आहे, मोठा होत आहे. आपली शिवसेना आणि धनुष्यबाण आपल्याकडे आहे, ही जमेची बाजू आहे. सत्याचा नेहमी विजय होत असतो, त्यामुळे हे आपल्याकडे आहे. येथे जमलेल्या गर्दीमुळे शिवसेना कोणाची आहे? हे सांगण्याची आवश्यकता राहिलेली नाही. बाळासाहेब असते तर राम मंदिर आणि कलम ३७० हटवण्याच्या कामगिरीसाठी पंतप्रधान मोदींचे भरभरून कौतुक केले असते. पण जे वारसा सांगता आहेत, त्यांनी एकही शब्दही उच्चारला नाही. यामुळे हिंदुत्वावर त्यांनी बोलूच नये.

जोवर एखादी व्यक्ती तुमच्यासोबत असते तोवर चांगली असते आणि तुम्हाला सोडून गेली की कचरा असते. गद्दार होते. एके दिवशी हा महाराष्ट्र आणि गेलेले कार्यकर्ते तुम्हाला कचरा केल्याशिवाय राहणार नाही, असा घाणाघात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता केला. त्यांनी आत्मपरीक्षण, आत्मचिंतन करायला हवे, हे त्यांना आपण सांगायची गरज नाही, तर त्यांना हे कळले पाहिजे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number