अभिनेते मिथुन चक्रवर्तींना मोदींनी का फटकारले ?

मुंबई, १३ फेब्रुवारी २०२४ , प्रतिनिधी : ज्येष्ठ अभिनेते आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांना छातीत तीव्र वेदना होत असल्याच्या तक्रारीनंतर शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सोमवारी दुपारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर माध्यमांशी संवाद […]

अभिनेते मिथुन चक्रवर्तींना मोदींनी का फटकारले ?

मुंबई, १३ फेब्रुवारी २०२४ , प्रतिनिधी : ज्येष्ठ अभिनेते आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांना छातीत तीव्र वेदना होत असल्याच्या तक्रारीनंतर शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सोमवारी दुपारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना मिथुन चक्रवर्ती यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांच्याशी फोनवर चर्चा केली. तब्येतीची काळजी न घेतल्याने मला फटकारले, असे मिथुन चक्रवर्तींनी सांगितले. त्यानंतर त्यांनी आपल्या चाहत्यांना एक मोलाचा संदेश दिला. ते म्हणाले की, “मी राक्षसासारखे खातो. त्यामुळेच मला शिक्षा झाली. प्रत्येकाला माझा सल्ला आहे की, त्यांनी आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे. ज्यांना मधुमेह आहे त्यांनी मिठाई खाल्ल्याने काही फरक पडत नाही, असा गैरसमज नसावा.तुमची काळजी घ्या.”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number