मुंबई, १० फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा ते ठाणे दरम्यान आणि हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान मेगाब्लॉक आहे. पश्चिम रेल्वेवर सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यान मेगाब्लॉक आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द होतील तसेच काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.
रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक
मध्य रेल्वे मुख्य मार्ग – माटुंगा ते ठाणे – जाणाऱ्या आणि येणाऱ्या धीम्या मार्गावर – सकाळी ११.०५ ते दुपारी ०३.३५
मध्य रेल्वे हार्बर मार्ग – पनवेल ते वाशी – जाणाऱ्या आणि येणाऱ्या मार्गावर – सकाळी ११.०५ ते दुपारी ०४.०५
पश्चिम रेल्वे – सांताक्रुझ ते गोरेगाव – जाणाऱ्या आणि येणाऱ्या जलद मार्गावर – सकाळी १० ते दुपारी ३