उत्तराखंडच्या विधानसभेत समान नागरी संहिता विधेयक मंजूर

डेहराडून, ७ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : उत्तराखंडच्या विधानसभेत समान नागरी संहिता विधेयक मंजूर झाले आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर समान नागरी संहिता मंजूर करून घेणारे उत्तराखंड हे पहिले राज्य म्हणावे लागेल. कारण गोव्यात असलेला समान नागरी कायदा हा पोर्तुगिजांच्या काळापासून असलेल्या समान नागरी कायद्यात थोडे बदल करून नव्याने लागू करण्यात आला होता. तर उत्तराखंडच्या विधानसभेत मंजूर […]

उत्तराखंडच्या विधानसभेत समान नागरी संहिता विधेयक मंजूर

डेहराडून, ७ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : उत्तराखंडच्या विधानसभेत समान नागरी संहिता विधेयक मंजूर झाले आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर समान नागरी संहिता मंजूर करून घेणारे उत्तराखंड हे पहिले राज्य म्हणावे लागेल. कारण गोव्यात असलेला समान नागरी कायदा हा पोर्तुगिजांच्या काळापासून असलेल्या समान नागरी कायद्यात थोडे बदल करून नव्याने लागू करण्यात आला होता. तर उत्तराखंडच्या विधानसभेत मंजूर झालेली समान नागरी संहिता ही पूर्णपणे भारतीय संस्कृतीचा विचार करून तयार करण्यात आली आहे. ही संहिता राज्यपालांच्या सहीने कायद्यात रुपांतरीत होऊन राज्यात लागू होईल. उत्तराखंडमधील आदिवासींना समान नागरी संहिता लागू होणार नाही.

उत्तराखंडच्या विधानसभेत समान नागरी संहिता विधेयक मंजूर
आवाजी मतदानाने विधेयक मंजूर
भारतीय संस्कृतीचा विचार करून तयार केलेली संहिता
राज्यपालांच्या सहीने विधेयकाचे कायद्यात रुपांतर होणार
उत्तराखंडमधील आदिवासींना समान नागरी संहिता लागू होणार नाही

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number