त्र्यंबकेश्वर, ७ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पौषवारीनिमित्त महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते ही महापूजा करण्यात आली. पालकमंत्र्यांनी राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊ दे अशी प्रार्थना संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या चरणी केली. याप्रसंगी अहमदनगर जिल्ह्यातील राहता येथील धानेकर या वारकरी जोडप्याचा पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पौषवारीला आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवण्यात आल्या आहेत.