श्रेयस अय्यरने बेन स्टोक्सला दिलं ठणठणीत उत्तर

विशाखापट्टणम, ०६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : सध्याच्या भारतीय संघातील सर्व खेळाडू जर कोणी डिवचलं तर शांत बसणारे नाहीत. या गोष्टीचे उत्तम उदाहरण म्हणजे श्रेयस अय्यर. श्रेयस अय्यरने बेन स्टोक्सला त्याच्याच भाषेत चोख उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरी कसोटी सामन्यात श्रेयस अय्यरने एक मोठा फटका मारला होता, हा […]

श्रेयस अय्यरने बेन स्टोक्सला दिलं ठणठणीत उत्तर

विशाखापट्टणम, ०६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : सध्याच्या भारतीय संघातील सर्व खेळाडू जर कोणी डिवचलं तर शांत बसणारे नाहीत. या गोष्टीचे उत्तम उदाहरण म्हणजे श्रेयस अय्यर. श्रेयस अय्यरने बेन स्टोक्सला त्याच्याच भाषेत चोख उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरी कसोटी सामन्यात श्रेयस अय्यरने एक मोठा फटका मारला होता, हा फटका आता सीमारेषे पार जाईल असे वाटत होते. त्यामुळे श्रेयस थोडा सुखावला होता. पण बेन स्टोक्स यावेळी धावत त्या चेंडूच्या मागे गेला आणि धावत त्याने अप्रतिम झेल घेतला. हा झेल पकडल्यावर बेन स्टोक्सने धमाकेदार सेलिब्रेशन केले. यावेळी बेन स्टोक्सने सेलिब्रेशन करताना आपल्या हाताचे एक बोट दाखवले. ही गोष्ट श्रेयस अय्यरला फारशी आवडली आणि पटली नाही. या सामन्याच्या दुसऱ्या डावात बेन स्टोक्स फलंदाजीला आला होता. बेन स्टोक्सवर इंग्लंडचा संघ अवलंबून होता. पण त्याचवेळी एक चोरटी धाव घेण्याच्या नादात तो धावचीत झाला. यावेळी श्रेयस अय्यरने थेट फेकीने स्टम्प उडवले. यावेळी बेन स्टोक्स आऊट आहे की नाही, ही गोष्ट तपासण्यासाठी रिप्ले पाहिला गेला आणि तिसऱ्या पंचांनी बेन स्टोक्स हा धावचीत झाल्याचा निर्णय घेतला. त्यानंतर श्रेयसने जोरदार सेलिब्रेशन केले आणि बेन स्टोक्सने जसं त्याला बाद केल्यावरर हाताचे बोट दाखवले होते, तसेच दाखवले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number