उध्दव ठाकरे दोन दिवस रायगड दौऱ्यावर

रायगड, ०१ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ आजपासून दोन दिवस रायगडात धडाडणार आहे. जनसंवाद दौऱ्यानिमित्त उद्धव ठाकरे यांच्या १ फेब्रुवारी रोजी पेण, अलिबाग आणि रोहे तर २ फेब्रुवारी रोजी पोलादपूर, म्हसळा आणि माणगाव येथे सहा झंझावाती सभा होणार आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या सलग दोन दिवसांच्या या ऐतिहासिक सभांची शिवसैनिकांनी जोरदार […]

उध्दव ठाकरे दोन दिवस रायगड दौऱ्यावर

रायगड, ०१ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ आजपासून दोन दिवस रायगडात धडाडणार आहे. जनसंवाद दौऱ्यानिमित्त उद्धव ठाकरे यांच्या १ फेब्रुवारी रोजी पेण, अलिबाग आणि रोहे तर २ फेब्रुवारी रोजी पोलादपूर, म्हसळा आणि माणगाव येथे सहा झंझावाती सभा होणार आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या सलग दोन दिवसांच्या या ऐतिहासिक सभांची शिवसैनिकांनी जोरदार तयारी केली आहे. विश्वासघातकी भाजप आणि फंदफितुरी करणाऱ्या गद्दार मिंध्यांचा उद्धव ठाकरे कसा समाचार घेणार याकडे रायगडसह अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

उद्धव ठाकरे यांचा जनसंवाद दौरा रायगड जिह्यात १ आणि २ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या दौऱ्यात उद्धव ठाकरे जिह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि जनतेशी संवाद साधणार आहेत. या दोन दिवसांत त्यांच्या एकूण सहा सभा होणार आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या प्रथमच सलग सहा सभा होणार असल्याने शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण असून त्यांच्या स्वागताची रायगड जिह्यात ठिकठिकाणी जय्यत तयारी केली आहे. भगवे झेंडे, बॅनर्स आणि भगव्या स्वागत कमानी लक्षवेधक ठरल्या आहेत. या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांच्या समवेत शिवसेना नेते सुभाष देसाई आणि शिवसेना नेते अनंत गीते हे देखील उपस्थित राहणार आहेत. दक्षिण रायगड जिल्हा संपर्कप्रमुख संजय मानाजी कदम, मध्य रायगड जिल्हा संपर्कप्रमुख विष्णू पाटील, सहसंपर्कप्रमुख आणि पदवीधर मतदारसंघ यंत्रणाप्रमुख किशोर जैन, जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, सुरेंद्र म्हात्रे, दक्षिण रायगड जिल्हा संपर्क संघटक ज्योत्स्ना दिघे, जिल्हा संघटक डॉ. स्विटी गिरासे, महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप, रोहे तालुकाप्रमुख समीर शेडगे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिकांनी स्वागताची जय्यत तयारी केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number