छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस टँकरचा अपघात

संभाजीनगर, ०१ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी: शहरातील सिडको उड्डाणपुलाच्या दुभाजकाला एलपीजी गॅस वाहणाऱ्या ट्रकने धडक दिली आहे. यातील गॅस अत्यंत ज्वलनशील असल्यामुळे गेल्या ३ तासांपासून सदर टँकरवर अग्निशमन दलाच्या ६ टँकरच्या माध्यमातून पाण्याचा मारा करण्यात येत आहे. ज्यामुळे सदर गॅस थंडच राहून कुठलीही दुर्घटना घडणार नाही. दरम्यान, सदर गॅस टँकरमुळे सिडको चौकातील संपूर्ण वाहतूक अन्य पर्यायी […]

छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस टँकरचा अपघात

संभाजीनगर, ०१ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी: शहरातील सिडको उड्डाणपुलाच्या दुभाजकाला एलपीजी गॅस वाहणाऱ्या ट्रकने धडक दिली आहे. यातील गॅस अत्यंत ज्वलनशील असल्यामुळे गेल्या ३ तासांपासून सदर टँकरवर अग्निशमन दलाच्या ६ टँकरच्या माध्यमातून पाण्याचा मारा करण्यात येत आहे. ज्यामुळे सदर गॅस थंडच राहून कुठलीही दुर्घटना घडणार नाही. दरम्यान, सदर गॅस टँकरमुळे सिडको चौकातील संपूर्ण वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने सुरू आहे. नागरिकांनी देखील सिडको उड्डाणपूल, नाईक कॉलेजजवळील परिसरात जाणे काही तास टाळावे. याचबरोबर सिडको चौकातून मुकुंदवाडीकडे,सेव्हन हील कडे जाण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number