पुणे, ३१ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : पुणे महानगरपालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प दहा हजार कोटी रुपयांचा असेल, असा प्राथमिक अंदाज आहे. महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या रकमेचा अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे. या अर्थसंकल्पाद्वारे पुणे महानगरपालिकेच्या अनेक विकासकामांना चालना दिली जाईल. पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांना विकासाकरिता अतिरिक्त निधी दिला जाईल. मागच्या वर्षी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी ९५१५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. यंदा अर्थसंकल्पात दहा टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे.