राज ठाकरे चार दिवसीय नाशिक दौऱ्यावर

नाशिक, २९ जानेवारी २०२४, प्रतिनिधी: आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा नुकताच झाला, तर उद्धव गटाकडून राज्यव्यापी अधिवेशन झाले. आता मनसेप्रमुख राज ठाकरे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिकमध्ये चार दिवसांचा तळ ठोकणार आहे. १ ते ४ फेब्रुवारी असा त्यांचा दौरा असेल. नुकतीच मनसे पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर तयारीला लागा मी येतोय, […]

राज ठाकरे चार दिवसीय नाशिक दौऱ्यावर

नाशिक, २९ जानेवारी २०२४, प्रतिनिधी: आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा नुकताच झाला, तर उद्धव गटाकडून राज्यव्यापी अधिवेशन झाले. आता मनसेप्रमुख राज ठाकरे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिकमध्ये चार दिवसांचा तळ ठोकणार आहे.

१ ते ४ फेब्रुवारी असा त्यांचा दौरा असेल. नुकतीच मनसे पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर तयारीला लागा मी येतोय, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. निवडणूक तयारीचा भाग म्हणून नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी सरचिटणीस किशोर पाटील यांची निरिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांनीही पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावा ठाकरेंकडे सादर केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number