जरांगेंना दिलेल्या अधिसूचनेत काय आहे आणि काय नाही ?

वाशी, २७ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्र शासनाने एक अधिसूचना काढली आहे. या अधिसूचनेची एक प्रत शनिवार २७ जून २०२४ रोजी मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना दिली. अधिसूचनेची प्रत हाती आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हातून फळाचा रस घेऊन मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्याचे जाहीर केले. यानंतर जरांगेंच्या […]

जरांगेंना दिलेल्या अधिसूचनेत काय आहे आणि काय नाही ?

वाशी, २७ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्र शासनाने एक अधिसूचना काढली आहे. या अधिसूचनेची एक प्रत शनिवार २७ जून २०२४ रोजी मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना दिली. अधिसूचनेची प्रत हाती आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हातून फळाचा रस घेऊन मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्याचे जाहीर केले. यानंतर जरांगेंच्या समर्थकांनी जल्लोष केला. मराठा आरक्षणाची मागणी करत असलेल्या आंदोलकांनी आनंदोत्सव साजरा केला. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊ की अधिसूचनेत काय आहे आणि काय नाही ?

अधिसूचना काय सांगते ?

आरक्षणाचा लाभ पितृसत्ताक पद्धतीनुसारच
आरक्षणाचा लाभ सजातीय लग्नातच
आरक्षणाचा लाभ कुणबी प्रमाणपत्र असलेल्यांनाच
अनुसूचित जाती-जमाती, भटके विमुक्त पण कुणबी होऊ शकतात.
आरक्षणाचा लाभ चौकशीत पुरावा सिद्ध झाल्यासच

अधिसूचनेत काय नाही ?

आईकडील नातेवाईकांना आरक्षण लाभ नाही.
आंतरजातीय विवाहात आरक्षणाचा लाभ नाही.
सरसकट मराठे सरसकट कुणबी होणार नाहीत.
मराठवाड्यातल्या मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण नाही.
पुरावा नसेल तर मराठ्यांना कुणबी आरक्षण मिळणार नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number