भिवंडीत सात लाखांचे बनावट जिरे जप्त

भिवंडी, २६ जानेवारी २०२४, प्रतिनिधी: भिवंडी शहरात बनावट जिरे विक्री करण्यासाठी आलेल्या टेम्पोवर शांतीनगर पोलिसांनी धाड टाकून ७ लाख १९ हजार ७०० रुपये किमतीचा २३९९ किलो बनावट जिरे जप्त केले आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक केली असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. शादाब इस्लाम खान वय […]

भिवंडीत सात लाखांचे बनावट जिरे जप्त

भिवंडी, २६ जानेवारी २०२४, प्रतिनिधी: भिवंडी शहरात बनावट जिरे विक्री करण्यासाठी आलेल्या टेम्पोवर शांतीनगर पोलिसांनी धाड टाकून ७ लाख १९ हजार ७०० रुपये किमतीचा २३९९ किलो बनावट जिरे जप्त केले आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक केली असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. शादाब इस्लाम खान वय ३३ वर्ष आणि चेतन रमेशभाई गांधी वय ३४ वर्ष असे बनावट जिरे प्रकरणी अटक केलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. शांतीनगर पोलिसांनी पालघर येथील बनावट जिरा फॅक्टरी सील बंद केले असून आरोपींना न्यायालयात हजर केले असता २७ जानेवारी पर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number