‘जरांगेंची लोणावळा – वाशी पदयात्रा’

लोणावळा, २५ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे आणि आरक्षणाचा लाभ मिळवून द्यावा अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथून समर्थकांसह मुंबईच्या दिशेने पदयात्रा सुरू केली आहे. ही पदयात्रा गुरुवारी लोणावळा ते वाशी टप्पा पार करणार आहे. मुंबईत प्रजासत्ताक दिनी पोहोचून मागणी पूर्ण होईपर्यंत बेमुदत उपोषण करणार असल्याचे […]

‘जरांगेंची लोणावळा – वाशी पदयात्रा’

लोणावळा, २५ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे आणि आरक्षणाचा लाभ मिळवून द्यावा अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथून समर्थकांसह मुंबईच्या दिशेने पदयात्रा सुरू केली आहे. ही पदयात्रा गुरुवारी लोणावळा ते वाशी टप्पा पार करणार आहे. मुंबईत प्रजासत्ताक दिनी पोहोचून मागणी पूर्ण होईपर्यंत बेमुदत उपोषण करणार असल्याचे मनोज जरांगे यांनी जाहीर केले आहे. वाशीची कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी, वाशी) बंद ठेऊन मराठा आंदोलकांना राहण्यासाठी जागा दिला जाणार आहे. ही व्यवस्था करण्यासाठी गुरुवार २५ जानेवारी रोजी वाशीची कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असेल. तर प्रजासत्ताक दिनी अर्थात शुक्रवार २६ जानेवारी रोजी सार्वजनिक सुटी असल्यामुळे वाशीची कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असेल. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत सर्व प्रकारच्या जड-अवजड, मालवाहतूक करणा-या वाहनांना २५ आणि २६ जानेवारी प्रवेशबंदी आहे. रुग्णवाहिका, जीवनावश्यक मालाची वाहतूक करणारी वाहने, पोलिसांची वाहने, अग्निशमन दलाची वाहने, पदयात्रेसोबतची वाहने, प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस यांना प्रवेशबंदीतून सवलत देण्यात आली आहे.

तुर्भे उड्डाणपूल ते वाशीतील छत्रपती शिवाजी चौकापर्यंतचा दोन्ही बाजूंचा रस्ता वाहतुकीसाठी बंद

पनवेल-सायन मार्गाने वाशी प्लाझा येथून पुढे जाता येणार

महापे पावणे पूल कोपरखैरणेकडून येणारी सर्व वहाने पामबीच रोडने अरेंजा सिग्नल मार्गे पुढे जातील

अरेंजा सिग्नलकडून तुर्भेकडे जाणारा मार्ग बंद

पामबीच रोड, सीबीडी बेलापूर मार्ग येथून कोपरी ते अरेंजा सिग्नल दरम्यान वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी, वाशी) पर्यंत जाणारे सर्व मार्ग बंद

अन्नपूर्णा सिग्नल, माथाडी सिग्नलकडून पुनित कॉर्नर मार्गाकडे वळून कोपरीकडे जाणारे तसेच सरळ बोनकडेकडे जाणा-या सर्व वाहनांना प्रवेश बंदी

पर्यायी रस्ता म्हणून सेक्टर २६ मधील अंतर्गत मार्गांचा वापर करण्यास परवानगी

बोनकडे सिग्नलकडून पुनित कॉर्नर मार्ग माथाडी भवनकडे येणा-या सर्व वाहनांना प्रवेशबंदी

पुनीत कॉर्नर येथून उजवीकडून पुढे जाता येणार

एव्हलॉन स्कूल चौकातून वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी, वाशी) पर्यंत जाणारे – येणारे मार्ग बंद

सानपाडा रेल्वे स्थानकासमोरील पूल ते वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी, वाशी) सिग्नलकडे जाणारे – येणारे मार्ग बंद

सेक्टर २० मधील तुर्भे मार्गे माथाडी भवनकडे येणा-या सर्व वाहनांना प्रवेशबंदी

दक्षिणमुखी हनुमान मंदिर चौक येथे जनता मार्केटकडून सर्व्हिस रोडने ये-जा करणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number