नगरमध्ये अपघात, ६ जणांचा मृत्यू

नगर, २४ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : नगर कल्याण महामार्गावर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर, ठाणे – मेहकर एसटी बस आणि इको गाडी यांचा अपघात झाला. ढवळपुरी फाट्याजवळ बुधवारी पहाटे अडीच वाजता अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. अपघातस्थळीच पाच जणांचा मृत्यू झाला तर एका व्यक्तीचा मृत्यू उपचार सुरू असताना रुग्णालयात झाला. अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून […]

नगरमध्ये अपघात, ६ जणांचा मृत्यू

नगर, २४ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : नगर कल्याण महामार्गावर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर, ठाणे – मेहकर एसटी बस आणि इको गाडी यांचा अपघात झाला. ढवळपुरी फाट्याजवळ बुधवारी पहाटे अडीच वाजता अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. अपघातस्थळीच पाच जणांचा मृत्यू झाला तर एका व्यक्तीचा मृत्यू उपचार सुरू असताना रुग्णालयात झाला. अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. अपघातात तिन्ही वाहनांचा चुराडा झाला. निलेश रावसाहेब भोर (दसवडे), जयवंत रामभाऊ पारधी (जांबुत खुर्द), संतोष लक्ष्मण पारधी (जांबुत खुर्द), प्रकाश रावसाहेब थोरात (वारणवाडी), सचिन कांतीलाल मंडलीचा (टाकळी मानूर), अशोक चिमा केदार (जांबुत खुर्द) अशी मृतांची नावं आहेत. सुयोग अडसूळ नावाचा तरुण अपघातात जखमी झाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number