मुंबई, २२ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना गुरुवार २५ जानेवारीपासून हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि स्पोर्ट्स १८ नेटवर्क तसेच जिओ सिनेमा या मोबाईल अॅपवर केले जाणार आहे. या कसोटी सामन्यात विराट कोहली खेळणार नाही. कौटुंबिक कारणामुळे कोहलीने मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये खेळू शकणार नसल्याचे बीसीसीआयला कळवले आहे. कोहलीच्या अनुपस्थितीत कोण खेळणार आणि भारताच्या संघात कोणकोणत्या खेळाडूंचा समावेश असेल या प्रश्नाचे उत्तर बीसीसीआयची निवड समिती लवकरच देणार आहे. अद्याप भारताचा पहिल्या कसोटीचा संघ जाहीर झालेला नाही. यामुळे संघात कोण असेल आणि कोहलीच्या अनुपस्थित कोण खेळेल, यावरून चर्चेला उधाण आले आहे.