मुंबई पोलिसांची हजारो पदे रिक्त

मुंबई, २१ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : मुंबई पोलिसांची १२ हजार ८९९ पदे रिक्त आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारात ही माहिती मिळवली आहे. अप्पर पोलीस आयुक्त ते शिपाई अशा वेगवेगळ्या पदांच्या अनेक जागा रिक्त आहेत. एकूण मुंबई पोलिसांची १२ हजार ८९९ पदे रिक्त आहेत. मुंबई पोलीस दलातील एकूण मंजूर पदे ५१ हजार […]

मुंबई पोलिसांची हजारो पदे रिक्त

मुंबई, २१ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : मुंबई पोलिसांची १२ हजार ८९९ पदे रिक्त आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारात ही माहिती मिळवली आहे. अप्पर पोलीस आयुक्त ते शिपाई अशा वेगवेगळ्या पदांच्या अनेक जागा रिक्त आहेत. एकूण मुंबई पोलिसांची १२ हजार ८९९ पदे रिक्त आहेत. मुंबई पोलीस दलातील एकूण मंजूर पदे ५१ हजार ३०८ एवढी आहेत. यापैकी ३८ हजार ४०९ पदे कार्यरत आहेत तर १२ हजार ८९९ पदे रिक्त आहेत.

पोलीस शिपाई पदासाठी २८ हजार ९३८ पदे मंजूर आहेत. यापैकी १७ हजार ८२३ पदे कार्यरत असून ११ हजार ११५ पदे रिक्त आहेत. पोलीस उपनिरीक्षकांची ३५४३ पदे मंजूर आहेत. यापैकी २३१८ पदे कार्यरत असून १२२५ पदे रिक्त आहेत. पोलीस निरीक्षकांची १०९० पदे मंजूर आहेत. यापैकी ९७७ पदे कार्यरत असून ३१३ पदे रिक्त आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्तांची १४१ पैकी २९ पदे रिक्त आहेत. पोलीस उपायुक्त यांची ४३ पदे मंजूर असून ३९ पदे कार्यरत आहेत, ४ पदे रिक्त आहेत. अप्पर पोलीस आयुक्तांची बारा पैकी एक पद रिक्त आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number