मोदींचे नाशिकमध्ये स्वागत

नाशिक, १२ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्र दौऱ्याच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या ओझर विमानतळावर पोहोचले. पंतप्रधानांचे राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी स्वागत केले. नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनीही पंतप्रधान मोदी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. पंतप्रधान नंतर २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या […]

मोदींचे नाशिकमध्ये स्वागत

नाशिक, १२ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्र दौऱ्याच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या ओझर विमानतळावर पोहोचले. पंतप्रधानांचे राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी स्वागत केले. नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनीही पंतप्रधान मोदी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

पंतप्रधान नंतर २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी हेलिकॉप्टरने निलीगिरी बाग हेलिपॅडकडे रवाना झाले. या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त (नाशिक शहर) संदीप कर्णिक उपस्थित होते.

यानंतर नरेंद्र मोदी हे रोड शो आणि राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी तपोवन मैदानाकडे रवाना झाले. मोदींच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी रांगोळ्या, तसेच रंगरंगोटी करण्यात आली आहे. मोदी रोड शो, काळाराम मंदिराचे दर्शन, गोदाकाठाची पाहणी करणार असून एक सभा पण घेणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number