मोदींचा महाराष्ट्र दौरा

मुंबई, ११ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवार १२ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मोदींच्या नवी मुंबई दौऱ्यात नेमकं काय घडणार आहे पाहुया… १. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पनवेल नवी मुंबईमध्ये येणार आहेत. २. अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा २२ किमी लांबीच्या अटल सेतुचे लोकार्पण ३. खारकोपर – उरण रेल्वे लाईन प्रकल्पाचे […]

मोदींचा महाराष्ट्र दौरा

मुंबई, ११ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवार १२ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.

मोदींच्या नवी मुंबई दौऱ्यात नेमकं काय घडणार आहे पाहुया…

१. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पनवेल नवी मुंबईमध्ये येणार आहेत.

२. अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा २२ किमी लांबीच्या अटल सेतुचे लोकार्पण

३. खारकोपर – उरण रेल्वे लाईन प्रकल्पाचे लोकार्पण

४. ठाणे आणि ऐरोली दरम्यान ‘दिघा गाव रेल्वे स्थानकाचे लोकार्पण

५. बेलापूर ते पेंधर नवी मुंबई मेट्रो मार्गाचे लोकार्पण

६. महानगर प्रदेशाच्या पश्चिम उप-प्रदेशासाठी सुर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण

७. खाररोड आणि गोरेगाव दरम्यान नवीन ६व्या रेल्वे लाईन प्रकल्पाचं लोकार्पण

८. ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह बोगदा प्रकल्पाचं भूमीपूजन

९. नमो अभियान – मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ

१०. नारी शक्ती दूत अॅप आणि उरण आणि खारकोपर दरम्यान ईएमयु ट्रेनची सुरुवात

११. लोकार्पणाच्या या कार्यक्रमासाठी दीड लाख जनसमुदाय राहणार उपस्थित

१२ .कार्यक्रमासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उलवे येथे भव्य मंडप उभारण्यात आलाय

‘अटल सागरी सेतूवर स्थानिकांना टोल माफी द्या’

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड अर्थात अटल सागरी सेतूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन होणार आहे. या सागरी सेतूवर एकेरी २५० रुपये तर दुहेरी ३७५ रुपये टोल आकारण्यात येणार आहे. हा सागरी सेतू उभारण्यासाठी उरण पनवेल तालुक्यातील स्थानिक ग्रामस्थांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत. त्यामुळे या मार्गाच्या १० किलोमीटर परीघातील नागरिकांना टोल माफी द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

पंतप्रधान मोदी शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर

२७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी शुक्रवारी शहरात दाखल होणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी पंचवटीतील काळाराम मंदिरात श्रीरामाचे दर्शन घेणार आहेत. तसेच रामकुंडावर गोदावरी पूजनही करणार आहेत. त्यानंतर पंतप्रधानांचा सुमारे दोन किलोमीटरचा रोड शो होईल. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काळाराम मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे. मंदिर परिसरातील सर्व रस्त्यांची डागडुजी करण्यात आली आहे. तसेच मंदिराच्या बाहेर नरेंद्र मोदी यांचे फलकही लावण्यात आले आहेत. गुरुवारपासूनच मंदिर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number