छत्रपती संभाजीनगर, १० जानेवारी २०२४, प्रतिनिधी : नायलॉन मांजावर संपूर्ण महाराष्ट्रात बंदी घालणारा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने दिला आहे. नायलॉन मांजाची निर्मिती, वितरण, खरेदी आणि विक्री यावर बंदी घालण्यात आली आहे. ज्या ठिकाणी नायलॉन मांजाशी संबंधित निर्मिती, वितरण, खरेदी वा विक्री यापैकी एखादी प्रक्रिया होत असेल ते ठिकाण सील करून नायलॉन मांजा जप्त करून नष्ट करावा असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच नायलॉन मांजाशी संबंधित निर्मिती, वितरण, खरेदी वा विक्री यापैकी एखाद्या प्रक्रियेशी संबंधित असलेल्या प्रत्येकाविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.