महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नऊ निर्णय

मुंबई, १० जानेवारी २०२४, प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत जनहिताचे नऊ निर्णय झाले. १. महाराष्ट्राच्या नागरी भागातील अतीतीव्र कुपोषित बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्यास मान्यता२. ग्रामविकास विभागातील योजनांच्या जाहिरात आणि प्रसिद्धीसाठी नवे लेखाशिर्ष उघडण्यास मंजुरी३. शासकीय लेख्यातून (मकोनी नमुना क्रमांक ४४ द्वारे) आहरीत करण्यात आलेल्या […]

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नऊ निर्णय

मुंबई, १० जानेवारी २०२४, प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत जनहिताचे नऊ निर्णय झाले.

१. महाराष्ट्राच्या नागरी भागातील अतीतीव्र कुपोषित बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्यास मान्यता
२. ग्रामविकास विभागातील योजनांच्या जाहिरात आणि प्रसिद्धीसाठी नवे लेखाशिर्ष उघडण्यास मंजुरी
३. शासकीय लेख्यातून (मकोनी नमुना क्रमांक ४४ द्वारे) आहरीत करण्यात आलेल्या सहायक अनुदानाच्या जलद संवितरण व संनियंत्रणासाठी आहरण व संवितरण अधिकारी आणि अन्य अशासकीय कार्यान्वयन प्राधिकारी यांच्याकरिता आभासी वैयक्तिक ठेव लेखा कार्यपद्धती लागू करण्यास मंजुरी
४. ‘सत्यशोधक’ मराठी चित्रपटास राज्य वस्तू व सेवा कर कायद्यांतर्गत आकारल्या जाणाऱ्या राज्य वस्तू व सेवा करातून माफी
५. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र विरार या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना आणि सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करण्यास मंजुरी
६. पं. दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदान पन्नास हजार रुपयांवरून एक लाख रुपयांपर्यंत करण्यास मंजुरी
७. महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ लागू असलेल्या पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित परिमंडळातील गावठाणामधून स्थलांतरीत न झालेल्या गावठाणातील प्रकल्पग्रस्तांना नवीन पुनर्वसित गावठाणाऐवजी रोख रक्कम स्वरुपात आर्थिक पॅकेज देणार
८. राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रति शिधापत्रिका आनंदाचा शिधा देण्यास मंजुरी
९. राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांची अतिरिक्त २८६३ आणि ११०६४ सहाय्यभूत पदे निर्माण करण्यास तसेच ५८०३ पदे बाहययंत्रणेद्वारे उपलब्ध करुन घेण्यास मंजुरी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number