नवी मुंबई मनसेत दुफळी

नवी मुंबई, ९ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : नवी मुंबई मनसेत दुफळी निर्माण झाली आहे. मनसेचे नवी मुंबई येथील पदाधिकारी आणि माथाडी नेते महेश जाधव यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या मुलावर अमित ठाकरेंवर गंभीर आरोप केला. दादर येथील राजगड कार्यालयात अमित ठाकरे यांच्यासह इतर काही जणांनी मारहाण केली, असा आरोप महेश जाधव यांनी केला. या मारहाणीत […]

नवी मुंबई मनसेत दुफळी

नवी मुंबई, ९ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : नवी मुंबई मनसेत दुफळी निर्माण झाली आहे. मनसेचे नवी मुंबई येथील पदाधिकारी आणि माथाडी नेते महेश जाधव यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या मुलावर अमित ठाकरेंवर गंभीर आरोप केला. दादर येथील राजगड कार्यालयात अमित ठाकरे यांच्यासह इतर काही जणांनी मारहाण केली, असा आरोप महेश जाधव यांनी केला. या मारहाणीत जखमी झाल्यामुळे रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेत आहे, असेही त्यांनी सांगितले. महेश जाधव यांनी अमित ठाकरेंवर आरोप केल्यानंतर खारघर येथील मेडिकव्हर रुग्णालयाबाहेर संतापलेल्या माथाडी कामगारांनी मनसे कार्यकर्त्यांना मारहाण केली. या घटनेनंतर मनसेने मराठी कामगार सेना बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. मनसेच्या मराठी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली. मनसेचे पदाधिकारी आणि मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी अमित ठाकरेंवर आरोप केल्यानंतर राज ठाकरे यांच्याकडून मराठी कामगार सेना बरखास्त करण्याचे आदेश देण्यात आले. महेश जाधव हे विकासकांकडून खंडणी मागायचे. त्यांना अनेक वेळा वाचवूनही ते राज आणि अमित यांच्या विरोधात बोलत आहेत, असा पलटवार करत मनसे नेते योगेश चिले यांनी मारहाणीचा आरोप फेटाळून लावला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number