काँग्रेसच्या सुनील केदारला जामीन

नागपूर, ९ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १५३ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात माजी मंत्री सुनील केदार याचा जामीन अर्ज मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंजूर केला. घोटाळ्यात सुनील केदार आणि इतर पाच आरोपींना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाचे पाच वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सुनील केदार याने सुरुवातीला सत्र न्यायालयात जामिनासाठी तसेच शिक्षा […]

काँग्रेसच्या सुनील केदारला जामीन

नागपूर, ९ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १५३ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात माजी मंत्री सुनील केदार याचा जामीन अर्ज मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंजूर केला. घोटाळ्यात सुनील केदार आणि इतर पाच आरोपींना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाचे पाच वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

सुनील केदार याने सुरुवातीला सत्र न्यायालयात जामिनासाठी तसेच शिक्षा रद्द करण्यासाठी धाव घेतली होती. मात्र, या घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. रिझर्व्ह बँक, नाबार्डचे अहवाल या खटल्यांमध्ये दाखल करण्यात आले आहेत. या घोटाळ्याने शेतकरी व गुंतवणूकदारांना मोठे नुकसान झाले असून, जामीन मिळाल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल, असे नमूद करीत अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांचा जामीनअर्ज तसेच शिक्षेला स्थगिती देण्याचा अर्ज फेटाळला होता. यामुळे त्यांनी त्यांचे वकील वरिष्ठ अधिवक्ता सुनील मनोहर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number