पुणे रेल्वेचा मेगाब्लॉक

पुणे , ०७ जानेवारी २०२३, प्रतिनिधी : पुणे-लोणावळा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाद्वारे पुणे ते लोणावळा दरम्यान अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांकरीता रविवारी (दि. ०७ जानेवारी २०२३) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे – लोणावळादरम्यान अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या बदलांची दखल घेऊन प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले […]

पुणे रेल्वेचा मेगाब्लॉक

पुणे , ०७ जानेवारी २०२३, प्रतिनिधी : पुणे-लोणावळा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाद्वारे पुणे ते लोणावळा दरम्यान अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांकरीता रविवारी (दि. ०७ जानेवारी २०२३) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे – लोणावळादरम्यान अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या बदलांची दखल घेऊन प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अप मार्गावरील गाड्या रद्द –

  • पुण्याहून लोणावळ्यासाठी ०९.५७ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६२
  • ११.१७ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६४
  • ३ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६६
  • शिवाजीनगरहून तळेगाव करीता ३.४७ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५८८
  • पुण्याहून लोणावळासाठी ४. २६ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६८
  • शिवाजीनगरवरून लोणावळाकरीता ५.२० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५७०

डाऊन मार्गावरील गाड्या रद्द –

  • लोणावळ्याहून शिवाजीनगरकरीता १०.०५ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५५९
  • लोणावळ्याहून पुण्यासाठी १४.५० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६१
  • तळेगाव येथून पुण्यासाठी जाणारी ४.४० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५८९
  • लोणावळ्याहून शिवाजीनगरकरीता ५.३० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६५
  • लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी ०६.०८ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६७
  • लोणावळ्याहून पुण्यासाठी ७ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६९

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number