भारतीय खलाशी असलेल्या जहाजाचे अपहरण

मोगादिशू, ५ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : भारतीय खलाशी असलेल्या एमव्ही लिला नॉरफोक नावाच्या मालवाहक जहाजाचे अपहरण झाले आहे. ही घटना अरबी समुद्रात सोमालियाजवळ घडली आहे. जहाजावर १५ भारतीय खलाशी आहेत. या घटनेची माहिती मिळताच भारतीय नौदलाने आयएनएस चेन्नई ही युद्धनौका घटनास्थळाच्या दिशेने रवाना केली आहे. पाच ते सहा सशस्त्र सागरी चाचे जहाजावर आहेत. सागरी चाच्यांनी […]

भारतीय खलाशी असलेल्या जहाजाचे अपहरण

मोगादिशू, ५ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : भारतीय खलाशी असलेल्या एमव्ही लिला नॉरफोक नावाच्या मालवाहक जहाजाचे अपहरण झाले आहे. ही घटना अरबी समुद्रात सोमालियाजवळ घडली आहे. जहाजावर १५ भारतीय खलाशी आहेत. या घटनेची माहिती मिळताच भारतीय नौदलाने आयएनएस चेन्नई ही युद्धनौका घटनास्थळाच्या दिशेने रवाना केली आहे. पाच ते सहा सशस्त्र सागरी चाचे जहाजावर आहेत. सागरी चाच्यांनी लायबेरियाचा झेंडा असलेल्या एमव्ही लिला नॉरफोक नावाच्या मालवाहक जहाजाचे अपहरण केले आहे. नौदल भारतीया खलाशांचे तसेच मालवाहक जहाजाचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. नौदलाने समुद्रात टेहळणी करणाऱ्या विमानाच्या मदतीने अपहृत जहाजावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number