आव्हाडांचा माफीनामा, पण…

शिर्डी, ४ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : मी कुठलंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही, पण आजकाल अभ्यासाला नाही भावनांना महत्त्व आहे. जर माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो, असे सुप्रिया गटाचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले. प्रभू राम मांसाहारी होते, असे वक्तव्य केल्यामुळे आव्हाड वादाच्या भोवऱ्यात सापडले. अनेकांनी आव्हाडांवर टीका केली. प्रकरण […]

आव्हाडांचा माफीनामा, पण…

शिर्डी, ४ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : मी कुठलंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही, पण आजकाल अभ्यासाला नाही भावनांना महत्त्व आहे. जर माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो, असे सुप्रिया गटाचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले. प्रभू राम मांसाहारी होते, असे वक्तव्य केल्यामुळे आव्हाड वादाच्या भोवऱ्यात सापडले. अनेकांनी आव्हाडांवर टीका केली. प्रकरण चिघळू लागल्याचे बघून आव्हाडांनी माफी मागितली. “आमचा राम सत्यासाठी १४ वर्ष वनवासात गेला होता, तो आम्हा बहुजनांचा आहे, तुम्ही त्याचं अपहरण करता. राम आमच्या हृदयात आहे, फक्त तोंडात नाही. तुम्हाला तुमचा राम निवडणुकांसाठी बाजारात आणायचाय, आमचा राम जन्मापासून आमच्या हृदयात आहे” असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number