टँकर चालकांच्या संपाला हिंसक वळण

वाशी, १ जानेवारी २०२४ प्रतिनिधी : नव्या मोटार वाहन कायद्याला विरोध करण्यासाठी देशभर पेट्रोल, डिझेलची वाहतूक करणाऱ्या टँकर चालकांनी संप पुकारला आहे. या संपाला हिंसक वळण लागले. ही घटना नवी मुंबई येथे घडले. हिंसक आंदोलन करत १५ ते २० टँकर चालकांनी धुमाकूळ घातला होता. अखेर एनआरआय पोलिसांनी हिंसक आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेतले. यानंतर परिसरात कडेकोट […]

टँकर चालकांच्या संपाला हिंसक वळण

वाशी, १ जानेवारी २०२४ प्रतिनिधी : नव्या मोटार वाहन कायद्याला विरोध करण्यासाठी देशभर पेट्रोल, डिझेलची वाहतूक करणाऱ्या टँकर चालकांनी संप पुकारला आहे. या संपाला हिंसक वळण लागले. ही घटना नवी मुंबई येथे घडले. हिंसक आंदोलन करत १५ ते २० टँकर चालकांनी धुमाकूळ घातला होता. अखेर एनआरआय पोलिसांनी हिंसक आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेतले. यानंतर परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

टँकर चालकांचा संप
आंदोलकांचा पोलिसांवर हल्ला
नवी मुंबईत आंदोलनाला हिंसक वळण

काय आहे नवा मोटार वाहन कायदा ?

नव्या मोटार वाहन कायद्यानुसार अपघातास जबाबदार ट्रक, टँकर चालकास दहा वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. दोषी चालकास सात लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचीही तरतूद आहे. याच कायद्याला देशभरातील अनेक ट्रक आणि टँकर चालकांचा विरोध आहे. आंदोलकांनी राज्यात ठिकठिकाणी टायर जाळून कायद्याला विरोध केला. अनेक प्रमुख रस्त्यांवर चालकांनी चक्काजाम आंदोलन केले. यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली. अनेक ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number