Homeक्रीडानववर्ष स्वागतासाठी पर्यटक अलिबागमध्ये दाखल
नववर्ष स्वागतासाठी पर्यटक अलिबागमध्ये दाखल
अलिबाग, ३१ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : नववर्ष स्वागताचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने कोकणात दाखल होत आहेत. मुंबईतून बोटीने अलिबागला येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असून मांडवा जेटिवर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. पर्यटकांच्या सुविधेसाठी मेरीटाईम बोर्डाने नियोजन केलंय. प्रवाशांची संख्या लक्षात घेता जादा बोटी सोडण्यात येत आहेत. रो-रो सेवेच्या फेऱ्या देखील वाढवण्यात आल्या आहेत. गर्दीमुळे […]
अलिबाग, ३१ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : नववर्ष स्वागताचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने कोकणात दाखल होत आहेत. मुंबईतून बोटीने अलिबागला येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असून मांडवा जेटिवर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. पर्यटकांच्या सुविधेसाठी मेरीटाईम बोर्डाने नियोजन केलंय. प्रवाशांची संख्या लक्षात घेता जादा बोटी सोडण्यात येत आहेत. रो-रो सेवेच्या फेऱ्या देखील वाढवण्यात आल्या आहेत. गर्दीमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस आणि मेरी टाईम बोर्ड समन्वयाने काम करीत आहे. सोमवारी परतीच्या प्रवासात गर्दी नियंत्रणासाठी जेटीवर बॅरीगेटींग करण्यात येणार आहे.
महत्त्वाचे मुद्दे –
थर्टी फर्स्ट आणि नव वर्ष स्वागतासाठी पर्यटक अलिबागमध्ये दाखल