नवी दिल्ली, २७ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : मुस्लिम लीग जम्मू काश्मीर (मसरत आलम गट) ही बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायदा (UAPA) अंतर्गत ‘बेकायदेशीर संघटना’ म्हणून घोषित करण्यात आली आहे. ही संघटना आणि तिचे सदस्य जम्मू-काश्मीरमधील देशविरोधी, फुटीरतावादी कारवायांमध्ये गुंतलेले आहेत; दहशतवादी कारवायांचे समर्थन करतात आणि लोकांना भडकावतात असा ठपका ठेवून कारवाई करण्यात आली आहे.
‘मुस्लिम लीग जम्मू काश्मीर’ बेकायदेशीर संघटना
बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायद्यानुसार घोषणा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली माहिती