मुंबई, २७ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : राज्यात मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाने इतर मागासवर्गीय यांचे मागासले पण ठरवण्याचे निकष अंतिम केले आहेत. हे निकष गोखले इन्स्टिट्यूटला सॅम्पल टेस्टिंग करण्यासाठी देण्यात येणार आहेत. आठवडाभरात याचा अहवाल अपेक्षित आहे. त्यानंतर पुढील महिनाभरात या सॅम्पल टेस्टिंग नुसार सर्वेक्षण करून त्याचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे.
राज्यात मागासलेपणाचे निकष ठरले
सर्वेक्षण प्रक्रियेत आयोगाचे पुढचे पाऊल
‘सॅम्पल टेस्टिंग’नंतर महिनाभरात सर्वेक्षण पूर्ण करून अहवाल सरकारकडे देणार
सामाजिकसाठी ४०, शैक्षणिकसाठी ३२ तर आर्थिक निकषांसाठी २८ टक्के धारांक