बीड, २३ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : मनोज जरांगे यांनी बीड जिल्ह्यात राज्य शासनाला इशारा देण्यासाठी इशारा सभा घेतली. या सभेत बोलताना जरांगेंनी २० जानेवारी २०२४ रोजी मुंबईत धडकणार, अशी घोषणा केली. मुंबईत बेमुदत उपोषण करणार, असेही जरांगेंनी जाहीर केले. मुंबईत १८ जानेवारी पर्यंत जमावबंदी लागू आहे. या आदेशाचे उल्लंघन करायचे नसल्यामुळे मुंबईत २० जानेवारी रोजी धडकणार, असे जरांगेंनी जाहीर केल्याची चर्चा आहे.
भुजबळांवर टीका
जरांगेंनी बीडच्या सभेत बोलताना राज्य शासनाचे मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली. मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांचा येवल्याचा येडपट असा उल्लेख केला. आपल्याला डाग लावला गेला… कोणी म्हणतं आमची घरं जाळली, आमचं हॉटेल जाळलं पण तुम्हीच तुमची हॉटेलं जाळली… असा आरोप जरांगेंनी सभेत बोलताना केला. भुजबळ मराठ्यांच्या वाटाला कशाला जातात, असा सवाल मनोज जरागेंनी केला. मी लई नमुना बेक्कार असल्याचं जरांगेंनी म्हटलं. मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात कोण बोलला तर त्यांना सुट्टी देणार नाही, असेही जरांगे म्हणाले.
जरांगेंनी टीका करताना पातळी ओलांडली
जरांगेंची मंत्री भुजबळांवर असभ्य टीका
‘सरकारने एकाचं ऐकू नये, जड जाईल’
मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
‘आरक्षण तर ओबीसीतूनच घेणार’
‘कुणबी नोंदी सापडतायत, आरक्षण मिळणारच’
मनोज जरांगे यांचा विश्वास